इझमायट्रिपचा १५व्या वर्धापनदिनानिमित्त मेगा सेल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | मुंबई | इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मला त्यांच्या १५व्या वर्धापन दिनाच्या साजरीकरणानिमित्त मेगा सेल्स सादर करण्याचा आनंद होत आहे. ट्रॅव्हल सेल्स व सूटचा हा भव्य उपक्रम १० जून २०२३ पर्यंत सक्रिय असेल. ग्राहक व प्रवासप्रेमी इझमायट्रिप वेबसाइट व अॅपवर सेलच्या या नियोजित कालावधीदरम्यान बुक केलेली विमाने, हॉटेल्स, बसेस, कॅब्स, क्रूझेस व हॉलिडे पॅकेजेसवर व्यापक सूटसह अनेक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

या विशेष वर्धापनदिन सेलदरम्यान प्रवासी देशांतर्गत विमानांवर जवळपास २४ टक्क्यांची सूट, आंतरराष्ट्रीय विमानांवर जवळपास ४० टक्क्यांची सूट आणि हॉटेल बुकिंग्जवर जवळपास ६० टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात. इझमायट्रिप बस बुकिंग्जवर जवळपास १५ टक्क्यांची सूट आणि कॅब आरक्षणांवर जवळपास १४ टक्क्यांच्या सूटसह परिवहन गरजांची देखील पूर्तता करेल. वर्धापन दिन साजरीकरणाचा भाग म्हणून ब्रॅण्ड फक्त १५,९९९ रूपयांपासून सुरू होणारे अतुलनीय हॉलिडे पॅकेजेस देखील देत आहेत. या पॅकेजेसमध्ये गंतव्यांची व्यापक श्रेणी समाविष्ट आहे आणि विविध प्रवास पसंतींची पूर्तता करतात,

ज्‍यामधून प्रत्येक पर्यटकाला संस्मरणीय अनुभव मिळण्याची खात्री मिळते. क्रूझ व्हेकेशनचा आनंद घेण्याचे स्वप्न असलेल्यांसाठी अॅनिव्हर्सरी सेल ५३,९९९ रूपयांपासून सुरू होणारे विशेष क्रूझ पॅकेजेस देतो. या ऑफर्स आरबीएल बँक क्रेडिट व डेबिट कार्ड, आयडीएफसी क्रेडिट कार्ड, बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड आणि येस बँक क्रेडिट कार्ड यावर उपलब्ध आहेत.

सेल कालावधीदरम्यान सर्वाधिक खर्च करणाऱ्या ग्राहकांना द मॅन कंपनी, गाना, पॉकेटएफएम, स्कायबॅग्ज, नेटमेड्स, असेम्ब्ली, स्किविया, आयमायआय, ग्रोफिल्टर, आयजीपी आणि कॅप्रीसी अशा निवडक ब्रॅण्ड सहयोगींकडून गिफ्ट वाऊचर्स मिळण्याची संधी असेल.

या अविश्वसनीय सूटचा लाभ घेण्यासाठी आणि गिफ्ट वाऊचर्स जिंकण्याची संधी मिळण्यासाठी ग्राहक बुकिंग प्रक्रियेदरम्यान कूपन कोड ‘इएमटी१५ ’चा वापर करू शकतात, ज्यामधून उत्तम बचतींची खात्री मिळेल.

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक रिकांत पिट्टी म्हणाले ‘‘आम्ही आमच्या सर्व ग्राहकांचे आभार मानतो, ज्यांनी इझमायट्रिपवर विश्वास दाखवला आहे आणि आम्हाला वर्षानुवर्षे त्यांचे पसंतीचे ट्रॅव्हल पार्टनर बनवले आहे. त्यांच्या अविरत पाठिंब्यामुळे आम्ही उद्योगामध्ये १५ वर्ष पूर्ण करण्याचा हा मोठा टप्पा पार केला आहे. या कौतुकाचे प्रतीक म्हणून आम्हाला ग्राहकांसाठी हृदयस्पर्शी गिफ्ट हा मेगा सेल सादर करण्याचा आनंद होत आहे. आम्ही अपवादात्मक प्रवास अनुभव देण्याप्रती कटिबद्ध आहोत आणि आगामी वर्षांमध्ये आमच्या बहुमूल्य ग्राहकांना अधिक उत्तम समर्पिततेसह सेवा देण्यास उत्सुक आहोत.’’


Back to top button
Don`t copy text!