सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होण्यासाठी अजूनही काही कालावधी लागणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सिंधुदुर्ग, दि. ७ : चिपी विमानतळाच्या धावपट्टीचा पृष्ठभागाचे काम समाधानकारक झाले नसल्याने प्रवासी वाहतुकीसाठी धावपट्टी परिपूर्ण नसल्याचे केंद्राच्या DGCA पथकाने अहवाल दिला आहे. चिपी विमानतळाची नुकतीच केंद्राच्या DGCA पथकाने पहाणी केली होती. DGCA च्या नियमाचे तंतोतंत पालन झालं नाही तर चिपी विमानतळ महाराष्ट्र एव्हिएशनच्या ताब्यात घेण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरू असून दिल्लीत 9 मार्चला एव्हिएशनच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

चिपी विमानतळाच्या धावपट्टीचा पृष्ठभाग अजूनही काही प्रमाणात खराब झाला असल्यामुळे अजून काही कालावधी विमानतळ सुरू होण्यासाठी लागेल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. DGCA अध्यापही धावपट्टी बाबत समाधानी नाही. प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी ज्या पद्धतीची धावपट्टी वरील पृष्ठभाग तयार झाला पाहिजे तसा तयार झाला नसल्याने DGCA ने प्रमाणपत्र दिलेलं नाही. त्यामुळे चिपी विमानतळ अजून काही काळ लांबणीवर गेल्याच चित्र आहे. 9 मार्चपर्यंत IRB ने DGCA ला हवी तशी धावपट्टी बनवून दिली नाही तर महाराष्ट्र सरकार हा चिपी विमानतळ ताब्यात घेईल. IRB कडून चिपी विमानतळचा करार रद्द करून राज्य सरकार ताब्यात घेऊन महाराष्ट्र एव्हिएशन कंपनीच्या ताब्यात देण्यात येईल, असं विनायक राऊत यांनी म्हटलं.

चिपी विमानतळ पूर्ण झालेला आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर चिपी विमानतळाचं लोकार्पण करणार आहे. गेल्या महिन्यात किंवा जानेवारी महिन्यात लोकार्पण करण्यासाठी इच्छा होती. मात्र तांत्रिक बाबी मुळे थोडासा उशीर होत आहे. पाठपुरावा चाललंय, लवकरात लवकर चिपी विमानतळ सुरू करणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

विमानतळासाठी मूलभूत लागणाऱ्या सुविधा रस्ता, इंटरनेट, पाणी या तीन गोष्टी पूर्ण होतील, त्यावेळी मी स्वतः मंत्र्यांना सांगेन परवानगी त्वरित द्या. या बाबी पूर्ण केल्याशिवाय कसं काय विमानतळ सुरू होईल. या बाबी पूर्ण करणं राज्य सरकारचं काम आहे. मुख्यमंत्र्याना विमानतळ सुरू करण्यासाठी घाई झाली आहे. तारखा जाहीर करण्याची स्पर्धा लागली आहे, असं खासदार नारायण राणे यांनी म्हटलं.

राज्य सरकारने करारात दिलेल्या सुविधा पुरवल्या नसल्याने विमानतळ सुरू होण्यासाठी विलंब होत आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि खासदार चिपी विमानतळ सुरु करणार म्हणून खोट सांगून जनतेला फसवत आहेत. चांगला मुहूर्त काढणारा माणूस बघून चिपी विमानतळाचा मुहूर्त काढून घ्यावा, अशी टीका मनसे कोकण संघटक परशुराम उपरकर यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!