जागतिक तापमान वाढ व कृत्रिम बुद्धिमत्ता याची जनजागृती करणे गरजेचे : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १६ सप्टेंबर २०२३ | फलटण | आगामी येणाऱ्या काळामध्ये पुढील आव्हानांचा जर विचार केला तर सर्वच प्रमुख वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांनी जागतिक तापमान वाढ यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता बाबतची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करणे गरजेचे आहे; असे मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण महाराजा मंगल कार्यालय येथे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रमोद निंबाळकर, भैरवनाथ उद्योग समूहाचे शिल्पकार बाळासाहेब कासार, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, अरविंद मेहता यांच्यासोबत शहरासह तालुक्यांमधील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक पिढी समोरील आवाहनही बदलत आलेली आहेत आमच्या वेळी ज्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्या गोष्टी नक्कीच मार्गी लावण्याचे काम आमच्या पिढीने केलेले आहे. आगामी काळामध्ये जर ग्रामीण भागामध्ये युवकाला टिकायचे असेल तर त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता शिकणे अत्यंत आवश्यक आहे. फलटण सारख्या भागामधून कृत्रिम बुद्धिमत्ता व जागतिक तापमानवाढ यावर काम करण्यासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे; असे मत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना आमदार दीपक चव्हाण म्हणाले की; फलटण तालुक्याला एक आगळीवेगळी अशी परंपरा आहे राज्याचे पहिले बांधकाम मंत्री व फलटणचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्यापासून फलटण शहराचा व तालुक्याच्या विकासाला जी चालना मिळालेली आहे ती चालना पुढे नेण्याचे काम आपल्या सर्वांचे नेते विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे साहेब करीत आहेत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहरासह तालुक्याचा सर्वांगीण विकास संपन्न होत आहे.

फलटण शहरासह तालुक्यातील पत्रकारांना सुद्धा एक आगळीवेगळी अशी परंपरा आहे. पूर्वीच्या काळातील पत्रकारिता व आत्ताची पत्रकारिता यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून येत आहे. ज्याप्रमाणे पत्रकारांमध्ये सुद्धा काही गोष्टी चांगल्या घडत नसतात; त्याचप्रमाणे आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी काही चांगल्या घडत नसतात. यामागे असणारी प्रवृत्ती ही चांगली असणे गरजेचे आहे; असे मत आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.

फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा आदर्श पत्रकार संघाच्या वतीने स्व. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार हा एबीपी वृत्तवाहिनीचे नवी दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी व गिरवी गावचे सुपुत्र प्रशांत कदम यांना देण्यात आला.

स्व. श्रीमती इंदुमती कासार यांच्या स्मृतीर्थ देण्यात येणारा पुणे विभागीय पुरस्कार हा दैनिक सांगोला नगरी व दैनिक माणदेश नगरीचे संपादक सतीश सावंत यांना देण्यात आला.

स्व. सुभाषराव निंबाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा सातारा जिल्हास्तरीय पुरस्कार हा दैनिक सकाळचे ढेबेवाडी चे प्रतिनिधी राजेश मोहनराव पाटील यांना देण्यात आला आहे.

सर्व पुरस्कार हे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!