जय शंकर होमिओपॅथी क्लिनिकचा उद्या उद्घाटन समारंभ


दैनिक स्थैर्य | दि. १६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
डी.एड्. चौक, शारदा अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, फलटण येथे नव्याने सुरू होत असलेल्या जय शंकर होमिओपॅथी क्लिनीकचा उद्घाटन समारंभ रविवार, दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण-कोरेगावचे आमदार दिपकराव चव्हाण असणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटणचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांची राहणार आहे.

सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. शिवानी उदयकुमार नाळे, श्री. उदयकुमार दिनकर नाळे व श्री. विजयकुमार दिनकर नाळे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!