‘दिलखुलास’ कार्यक्रमात एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची मुलाखत


दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून शनिवार दि.१३ व मंगळवार दि.१६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यभरात राबविण्यात येणारे उपक्रम, अंगणवाड्यांचा या उपक्रमातील सहभाग, शाळा पूर्व शिक्षण प्रकल्प, माझी कन्या भाग्यश्री योजना, बेबी केअर किट योजना, आदर्श अंगणवाडी योजना, कुपोषणमुक्त गाव ही संकल्पना व त्यासाठी सुरू असलेली कामे, आगामी काळातील विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!