अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन


स्थैर्य, फलटण, दि. १८: 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणुन अनेक देशांत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून फलटण एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा होणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू यांनी दिली आहे.

सध्याच्या कोरोना महामारीविरुद्ध लढताना योगाची आपल्याला मदत होत आहे. प्राणायाममुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते व श्‍वसनाचे विकार दूर होतात. सन 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केला. यावर्षी ही मागच्या वर्षी प्रमाणेच योगा दिन कार्यक्रम महाविद्यालयात व्हर्च्युअल पद्धतीने होत आहेत. सदरच्या आंतरराष्ट्रीय योगा कार्यक्रमात योगाचे प्रात्यक्षिक महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. टि. एम. शेंडगे हे करणार आहेत. तरी सदरच्या उपक्रमात सर्व विद्यार्थी , पालक, शिक्षक , नागरिक यांनी मोठ्या संख्येने ऑनलाइन पद्धतीने सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य मिलिंद नातू यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!