वीज बिल माफ न केल्यास तीव्र आंदोलन : सौ. कल्पनाताई गिड्डे


 

फलटण येथील महावितरणच्या कार्यालयातील अधिकार्‍यांना निवेदन देताना सौ.कल्पनाताई गिड्डे. समवेत पदाधिकारी व कार्यकर्ते.

स्थैर्य, दुधेबावी, दि.२९: कोरोना कालावधीत फलटण शहर व तालुक्यातील ग्राहकांची वीज बिले भरमसाठ वाढून आलेली आहेत. हे वीजबिल भरण्याची आर्थिक परिस्थिती सर्वच ग्राहकांच्यामध्ये राहिलेली नसल्याने वीज वितरण विभागाने वीज बिल माफ करून सहकार्य करावे अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या महिला किसान मोर्चाच्या राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. कल्पनाताई गिड्डे यांनी वीज वितरण विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, कोवीड महामारीमुळे सर्वसामान्य माणूस हतबल झाला असून अनेकांचे गेल्या सहा महिन्यापासूनचे वीजबील थकीत आहे. यामध्ये बहुतांश ग्राहकांचे वीजबिल भरमसाठ वाढून आले आहे. त्यातच कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबींचा राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे सौ.गिड्डे यांनी सांगितले आहे. 

यावेळी सौ.मोनलताई शिंत्रे, विनोद भोसले, संजय इंगळे, विनायक ढमाळ, शाम चोरमले, राजेश जाधव, सौ. मनिषा नामदास, सौ. सुमन नलावडे यांची उपस्थिती होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!