आनेवाडी टोलनाक्‍यावर अधिकाऱ्यास अपमानास्पद वागणूक; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, भुईंज, दि.२४: मंत्रालयात कार्यरत असलेले अतिरिक्त सचिव संतोष पराडकर हे कोल्हापूरहून मुंबईला निघाले असताना शनिवारी रात्री 12.20 च्या सुमारास आनेवाडी टोल नाका येथे फास्ट टॅग गाडीला असूनही टोलवरील फास्ट टॅग न चालल्याने दमदाटी करत कर्मचाऱ्याने दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी ओळखपत्र दाखवूनही त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला. याबाबत त्या अधिकाऱ्याने रीतसर रस्ते प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. 

आनेवाडी टोलनाक्‍यावर अधिकाऱ्यास अपमानास्पद वागणूक; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

आनेवाडी टोल नाक्‍यावर सतत वादावादी होत असते. शनिवारी सुटी घेऊन ड्युटीवर निघालेले अधिकारी पराडकर हे लेन क्रमांक आठमधून जात होते. गाडीला फास्ट टॅग होता; परंतु टोल व्यवस्थापनकडील मशिन ऍक्‍सेप्ट करत नसल्याने तेथील कर्मचारी हुज्जत घालू लागले. पराडकर यांनी स्वतःचे ओळखपत्र दाखवले तरी दमदाटी केली. 

त्यावरून वातावरण तणावपूर्ण झाले होते. पराडकर यांनी तक्रार केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेनेचे खंडाळा तालुकाप्रमुख आदेश जमदाडे यांनी आनेवाडी व तासवडे टोलनाक्‍यावर सामान्य व वाहनचालकांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचीही तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

येळकोट येळकोट जय मल्हार..! प्राजक्ता गायकवाडने उचलली खंडेरायांची ४२ किलो वजनाची खंडा तलवार


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!