संग्रामसिंहांना सातारा सर्वाधिक मताधिक्‍य देईल : शिवेंद्रसिंहराजे


 


स्थैर्य, सातारा, दि.२४ : “पुणे पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने संग्रामसिंह देशमुख यांच्यासारखा उमदा उमेदवार दिला आहे. ते सांगली जिल्ह्यातील असले तरी सातारा जिल्ह्यात त्यांचे काम आहे. त्यांनी तरुणांना येथे काम दिले आहे. त्या जोरावर सातारा त्यांना सर्वाधिक मताधिक्‍य देईल,” असा विश्‍वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. 

येळकोट येळकोट जय मल्हार..! प्राजक्ता गायकवाडने उचलली खंडेरायांची ४२ किलो वजनाची खंडा तलवार

अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखाना येथे देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सातारा जिल्हा भाजप अध्यक्ष विक्रम पावसकर, सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, अजिंक्‍यतारा कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव सावंत, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक कांचनताई साळुंखे उपस्थित होत्या. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “”संग्रामसिंह यांनी केवळ सांगली नाही तर सातारा जिल्ह्यात चांगली कामे केली आहेत. सातारा जिल्ह्यातील शेकडो युवकांना त्यांनी आपल्या ग्रीन पॉवर शुगर साखर कारखान्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर संपतराव अण्णा देशमुख सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून त्यांनी सातारा जिल्ह्यतील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. आपल्या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी सातारा जिल्ह्याची शान वाढवली आहे. या कारखान्याने नेहमी विविध क्षेत्रातील लोकांना आपले प्रावीण्य दाखवण्यासाठी पाठबळ दिले आहे.” 

कोरोनावर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय म्हणाले उद्धव ठाकरे??

या वेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, सभापती सरिता इंदलकर, राजेंद्र शेडगे, जितेंद्र सावंत, नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते, बाजार समिती सभापती विक्रम पवार, उपसभापती बाजार समिती नितीन कणसे, बापू नावाडकर आदी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!