दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटणच्या गजानन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याच्या सूचना ठेकेदारास फलटण नगरपालिकेने संबंधित ठेकेदारास दिलेल्या आहेत. याबाबत फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमीरभाई शेख यांनी सुशोभीकरण करण्यासाठी मुख्याधिकार्यांकडे अर्जाद्वारे मागणी केली होती व सुशोभीकरण झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार नगरपालिकेने ठेकेदारास सूचना केल्या असून याची माहिती पत्राद्वारे अमीरभाई शेख यांना नगरपालिकेने दिली आहे व आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे.
अमीरभाई शेख यांनी मुख्याधिकार्यांकडे केलेल्या अर्जात म्हटले होते की, गजानन चौकामधील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा गेल्या दोन वर्षांपूर्वी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसने केलेल्या आंदोलनामुळे बसविण्यात आला आहे. तथापि, या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे अर्धवट झाले असून पुढचे काम प्रलंबित आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे.