स्थैर्य, फलटण : राजाळे ता. फलटण येथील रामचंद शिंदे यांच्या मका पिकाच्या प्लॉटला भेट देऊन अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण व क्रोपसेप अंतर्गत मोबाईल कीड रोग सर्वेक्षण बाबत मल्हारी नाळे, सचिन जाधव यांनी माहिती दिली त्या सोबतच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती तेथे उपस्थित असणाऱ्या शेतकर्यांना दिली.
राजाळे ता. फलटण येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी राजाळे गावचे सरपंच मारुती मोहिते, माजी सरपंच संभाजी निंबाळकर, अशोक जगताप, पोलीस पाटील महेश शेडगे, तंटा मुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, प्रगतशील शेतकरी सुरेश निंबाळकर, जयवंतराव निंबाळकर, शिवाजी बनकर, शंकर माने, नितीन शेडगे, दत्तात्रय निंबाळकर, शिवाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.