राजापूर येथे कृषीदूतांनी दिली बीज प्रकियेची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २१ जून २०२४ | फलटण |
खटाव तालुक्यातील राजापूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदूतांनी ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पिकांवरील वाढत्या रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच पिकांना लवकरात लवकर परिपक्वता येण्यासाठी विविध प्रकारची बीज प्रक्रिया कृषिदूतांमार्फत करून दाखविण्यात आली.

यावेळी खरीप ज्वारी या पिकावरील बुरशीजन्य रोग नियंत्रण करण्यासाठी गंधक (सल्फर ९० जी) हे वापरण्यात आले. गंधक हे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे आणि त्यात प्रतिबंधात्मक, उपचारात्मक आणि स्पर्शिनाशक बुरशीनाशक गुणधर्माचे अद्वितीय संयोजन आहे. ग्रेन स्मट, लूज स्मट, स्पोरिस्पोरियम या रोगांसाठी योग्य उपाय आहे. तसेच बीज प्रक्रियेचे विविध फायदे शेतकर्‍यांना पटवून देण्यात आले. या प्रकियेविषयी माहिती शेतकरी कृषिसेवा केंद्रासमोर देण्यात आली.

यावेळी सूरज घनवट, अमोल झगडे, रामचंद्र घनवट, शालन घनवट, अनिता घनवट, कल्पना घनवट, सचिन घनवट, रामभाऊ घनवट, दीपक मदने व इतर शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. सी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, पीक रोगतज्ज्ञ प्रा. पी. व्ही. भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत अथर्व देवकर, यश निकम, रोहन बरबोले, सत्यजित धायगुडे, सुयोग भोसले, साहिल भोसले व पुष्कर बिसेन यांनी हा उपक्रम पार पडला.


Back to top button
Don`t copy text!