लॉकडाऊननंतर भारतातील पहिले निर्याती जहाज नेदरलँडला रवाना


 

स्थैर्य, पणजी, दि.१२: कोविड-१९ च्या
जागतिक महामारी संकटानंतर गोव्यातील चौगुले शिपयार्डस या कंपनीने निर्यात
बाजारपेठेत भारतातील पहिल्या वेसल (जहाज) ची यशस्वी निर्यात केल्याची घोषणा
केली आहे. ‘लेडी हेडविग’ नावाचे हे जहाज नेदरलँड्सस्थित ‘विजने अ‍ॅण्ड
बॅरंड्स’ या ग्राहकांसाठी रवाना करण्यात आले आहे. कोविडच्या संकटानंतर हे
यश गाठणारे आम्ही देशात पहिलेच असल्याचा आनंद असल्याचे चौगुले अ‍ॅण्ड
कंपनीचे कार्यकारी संचालक अर्जुन चौगुले म्हणाले.

या वेसलची एकूण लांबी ९८.२ मीटर, रुंदी
१३.४ मीटर, खोली ७.८ मीटर आणि ड्राफ्ट ५.६ मीटर एवढा आहे. नेदरलँडमधील
ग्राहकांकडून ६ जहाजांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी हे तिसरे जहाज
आहे. सोमवारी या जहाजाने गोव्यातून नेरलँडसाठी प्रवास सुरु केला. कोविडनंतर
निर्यात बाजारपेठेत पाठवलेले हे पहिलेच जहाज आहे.

जागतिक संकटातही जहाजाच्या निर्यातीवर
परिणाम होणार नाही, यासाठी टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. कोविड-१९ मधील
नियमांमुळे ओईएम सर्विस इंजिनीअर्स उपलब्ध नसतानाही टीमने साधनांच्या
उभारणीवर स्वत:च काम केले. अर्थात, ओईएम्सकडूनही यासाठी मदत करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय शिपबिल्डिंग बाजारपेठेत गांभीर्याने व्यवसाय करणारी कंपनी
बनण्यावर आमचा भर असल्याचेही चौगुले म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!