लसीवरील संशोधन आणि ती मोठ्या प्रमाणात बनवण्यात भारताची भूमिका महत्त्वाची असेल – बिल गेट्स


 

स्थैर्य, दि.२०: अमेरिकी बिझनेसमन आणि
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना महामारीच्या विरोधातील लढ्यामध्ये
भारताकडून अपेक्षा आहेत. गेट्स यांनी म्हटले की, भारतात होत असलेले रिसर्च
आणि मॅन्यूफॅक्चरिंग कोरोनाचा सामना करण्यात महत्त्वाची आहे. मोठ्या
प्रमाणात व्हॅक्सिन तयार करण्यात भारताची भूमिका महत्त्वाची असेल. त्यांनी
ग्रँड चॅलेंजेस अॅनुअल मीटिंग 2020 मध्ये हे म्हटले. या व्हर्जुअल मीटिंगचे
नेतृत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले होते.

या
बैठकीत कोरोना लस तयार करणे आणि त्याच्या उपचारांमध्ये येत असलेल्या
आव्हानांवर चर्चा झाली. गेट्स म्हणाले की, गेल्या दोन दशकांत भारताने
आरोग्य सुधारण्यासाठी मोठे काम केले आहे. त्यांच्याकडून पुढेही बर्‍याच
अपेक्षा आहेत.

संशोधकांनी काम करण्याची पध्दत बदलली

गेट्स
म्हणाले – संशोधकांनी नवीन पध्दतीने काम सुरू केले आहे. आता ते त्यांचे
संशोधन प्रकाशित होण्याची प्रतीक्षा करत नाही. ते दररोज त्यांचा डेटा शेअर
करत आहेत. महामारी सुरू झाल्यापासून संशोधकांनी कोरोनाव्हायरसचे 1 लाख 37
हजार जीनोमिक अनुक्रम जारी केले आहेत. औषध निर्मिती कंपन्या औषधांच्या
निर्मितीतही मदत करीत आहेत. पूर्वी कधीही न केल्यासारख्या गोष्टी ते करत
आहे.

‘एमआरएनए व्हॅक्सिनकडून अपेक्षा’

व्हॅक्सिन
तयार करण्याच्या आव्हानांवर ते म्हणाले की, ‘एमआरएन व्हॅक्सिनकडून खूप
अपेक्षा आहेत. एमआरएन व्हॅक्सिन मानवी सेल्स (रायबोज न्यूक्लिक अॅसिड)मध्ये
उपलब्ध अँटीजनच्या मदतीने काम करते. व्हायरसला संक्रमणापासून बचावण्यासाठी
आवश्यक अँटीजन निर्माण करते. जगात पहिल्यांदाच व्हॅक्सिनची अशा प्रकराचे
तंत्रज्ञान तयार केले जाण्याची शक्यता आहे.’

फक्त
लस तयार करणे पुरेसे नाही. याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
पोहोचवण्यातही समस्या येतील. कारण यासाठी कोल्ड चेनची योग्य सुविधा असणे
गरजेचे आहे. येणाऱ्या काळात एमआरएन प्लॅटफॉर्म्स जास्त प्रगत होतील. यामुळे
व्हॅक्सिनच्या किंमती कमी होतील, विद्यमान कोल्ड स्टोरेज सुविधांमध्ये
सुधारणा होईल.

‘तपासणी सुविधांमध्ये सुधारणेची गरज’

गेट्स
म्हणाले – तपासणीच्या सुविधांमध्ये सुधारणेची गरज आहे. सध्या काही
लोकांच्या टेस्टनंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो. काही टेस्ट्स नॅनो
व्हायरससाठी सेंसिटिव्ह नसल्यामुळे असे होते. अशी तपासणी आपल्याला मागे
घेऊन जात आहे. लक्षण नसलेल्या संक्रमितांची तपासणी करण्यास उशीर होत आहे.
सध्या लक्षणांच्या आधारावर संक्रमितांची ओळख होत आहे. हे बदलण्याची गरज
आहे. आपल्याला योग्य रिपोर्ट देणाऱ्या टेस्ट्सची गरज आहे. यासोबतच तपासणी
अशी व्हावी जी सहज सर्वच ठिकाणी करता येईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!