दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पोस्ट विभागात ड्रायव्हर पदांसाठी भरती जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी पास तरुणांसाठी भारतीय पोस्ट विभागात STAFF CAR DRIVER पदाच्या एकूण २४ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०२ नोव्हेंबर : सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय पोस्ट खात्याच्या वतीने तामिळनाडू सर्कलच्या चेन्नई मेल मोटर सर्व्हिसमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. दहावी पास आणि वाहन चालवण्याचा परवाना असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, इच्छुक उमेदवारांना ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

पात्रता आणि भरतीचे निकष

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे हलकी (LMV) किंवा जड (HMV) वाहन चालवण्याचा वैध परवाना असावा आणि किमान तीन वर्षे वाहन चालवल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. याशिवाय उमेदवाराला वाहनातील लहान-मोठे बिघाड ओळखता आणि दुरुस्त करता येणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार १९,९०० ते ६३,२०० रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अंतिम मुदत

उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज स्पीड पोस्टद्वारे पाठवणे बंधनकारक आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता ‘Senior Manager, Mail Motor Service, No. 37 Greams Road, Chennai – 600006’ असा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली असून, अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!