मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली भारत आत्मनिर्भर बनत आहे : जयकुमार शिंदे  सातारा येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

     सातारा येथे ‘भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरा’मध्ये मार्गदर्शन करताना जयकुमार शिंदे.

स्थैर्य, फलटण दि.१४ : केंद्र सरकारने आत्मनिर्भरता व राष्ट्रीय सुरक्षा याकडे विशेष लक्ष दिले आहे. शेती, उद्योग, व्यापार, संरक्षण आदी सर्वच क्षेत्रात देशाची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारत आत्मनिर्भर बनत आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी सातारा शहर यांच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल, सातारा  येथे भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना ‘आत्मनिर्भरता व राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर मार्गदर्शन करताना जयकुमार शिंदे बोलत होते.  प्रारंभी जयकुमार शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी जेष्ठ नेते बाळासाहेब गोसावी, संघटक यशवंत लेले, सरचिटणीस विठ्ठल बलशेठ्ठींवर, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, राहुल शिवनामे, नगरसेवक सुनील काळभोर, नगरसेविका प्राची शहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जयकुमार शिंदे पुढे म्हणाले, भारत देश आज जगात बलशाली व्हावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत. आज भारत शेती क्षेत्रात आत्मनिर्भर झाला आहे. शेतीवर आधारित असलेले सर्व व्यवसाय दुध, दुग्धजन्य पदार्थ, औषध निर्मिती या क्षेत्रामध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे. आपल्या देशांमध्ये तयार होणारा उत्पादित माल आपल्या लोकांच्या गरजा पूर्ण करून उर्वरित राहिलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर केला आणि म्हणून मेक इन इंडिया ची सुरुवात झाली. जसा आपला देश शेतीमालामध्ये आत्मनिर्भर झाला तसाच तो संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये झाला पाहिजे ही भूमिका घेऊन मोदीजींनी संरक्षण विषयक उत्पादन उपकरणासाठी लागणार्‍या काही गोष्टींना एक वर्षासाठी निर्यातबंदी केली व आधुनिक शस्त्र व हत्यारे तयार करण्यासाठी भारतातील खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन हे सर्व साहित्य भारतामध्ये तयार होण्यासाठी प्राधान्य दिले आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेला मेक इन इंडिया बरोबरच स्थानिक वस्तू खरेदीला प्राधान्य दिले गेले. 

कोरोना च्या पार्श्‍वभूमीवर या देशातील कोणताही माणूस उपाशी राहता कामा नये यासाठी केंद्र सरकारने रेशनकार्ड असो किंवा नसो सर्वांना मोफत धान्य देण्याची व्यवस्था केली. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मोफत व्यवस्था केली. गोरगरीब जनतेला विमा संरक्षण देऊन कोरोनाच्या काळात मदत झाली. घर बांधणी असेल फ्लॅट घेणे असेल यावर टॅक्समध्ये सूट दिली गेली. नवीन व्यवसायाला कर्ज पुरवठा करून जुन्या व्यवसायांमध्ये रिश्टर लोन देऊन व्यवसायाला चालना दिली. भारत हा जगाच्या पाठीवर बलशाली झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आज या प्रशिक्षण शिबिरातून जात ाना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाजातल्या दीनदलित दुबळ्या लोकांना मदत करण्याची भावना घेऊन जावी, असेही जयकुमार शिंदे यांनी  सांगीतले. 

शिबीरास सातारा शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!