शिक्षकांच्या प्रश्‍नांसंबंधी अखिल भारतीय शिक्षक महासंघाच्या पदाधिकार्‍यांची ना.हसन मुश्रीफ यांचेसमवेत चर्चा


 

      ना.हसन मुश्रीफ यांचा शिक्षक महासंघाच्यावतीने सत्कार करताना सिध्देश्‍वर पुस्तके. समवेत पदाधिकारी.

स्थैर्य, फलटण दि.१४ : अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सिद्धेश्‍वर पुस्तके यांच्या नेतृत्त्वाखाली महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी नुकतीच राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांची भेट घेवून शिक्षकांच्या प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा केली. 

यावेळी 2005 नंतर च्या शिक्षकांना जुनी पेन्शन, नवीन बदली धोरण, एमसीसीआयटीची वसुली कायमची रद्द करणे, रॅडम, विस्थापीत व जिल्हा आऊटने आलेले नविन शिक्षक आदी प्रश्‍नांवर ना.मुश्रीफ यांचेशी शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा झाली. 

या सर्व प्रश्‍नांबाबत सहानुभूती पुर्वक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन यावेळी ना.हसन मुश्रीफ यांनी देवून राज्यशासनाने राबवलेल्या रक्तदान उपक्रमात सर्व शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहनही ना.मुश्रीफ यांनी केले. 

यावेळी अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय कार्यवाहक अशोकराव पाटील, कोल्हापूर जिल्हा शिक्षक बँकेचे चेअरमन नामदेवराव रेपे, सातारा जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे, जेष्ठ नेते मच्छींद्र मुळीक, नेते सुरेशराव गायकवाड, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र बोराटे, गट नेते मोहन निकम, कोषाध्यक्ष समीर बागवान, कार्याध्यक्ष विक्रम डोंगरे, जि.प.तज्ञ सदस्य रुपेश जाधव, का.चिटणीस प्रविण घाडगे व पदाधिकारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!