
दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑगस्ट २०२६ | फलटण |
कोळकी (ता. फलटण) येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण माजी सैनिक किसन शिंदे व सौ. शिंदे यांच्या हस्ते झाले. ध्वरारोहणास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य विकास नाळे, माजी सदस्य सचिन रणवरे, ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच रेश्मा देशमुख, विक्रम पखाले, माजी सदस्य संजय देशमुख, दिलीप लोंढे, पोलीस पाटील मकरंद पखाले, युवा नेते रणजित काशिद, बनकर, प्रदीप भरते, भोसले सर, राजीव खिलारे, बळीप, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र खिलारे, उपाध्यक्ष संजीव गावडे, खजिनदार बाळासो शिंदे, नामदेव बनकर, राजेंद्र भोसले, वसंत गंगावणे, बाळासो शिंगाडे, तुकाराम ननवरे, सुभेदार अर्जुन बागल, लक्ष्मण लोहार, कॅ. नामदेव शेडगे, भीवराव जाधव, किशोर मिसाळ, बाळासो बागल, दत्तात्रय माने, किसन शिंदे, दिलीप भिसे, कोळकी ग्रामस्थ उपस्थित होते.
ध्वरारोहणानंतर जयकुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले व सैनिकांच्या अडचणी सोडवू तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही दिली.
माजी किशोर मिसाळ यांनी आभार मानले.
