जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून 144 च्या आदेशातून नव्याने काही अत्यावश्यक बाबींचा समावेश


स्थैर्य, सातारा, दि. ०७: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 आदेश जारी केले आहे. या आदेशानुसार,

अत्यावश्यक सेवेमध्ये पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे:

पेट्रोलियम संबंधित उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, डेटा सेंटर, क्लाऊ सर्व्हिस प्रोव्हायडर, आयटी-माहिती व तंत्रज्ञान सेवेशी संबंधित पायाभूत सुविधा आणि सेवा, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, फळ विक्रेते, व्हेटरीनरी हॉस्पीटल, ॲनिमल केअर सेंटर व पेट शॉप्स, अंडी, चिकन, मास, तसेच जनावरांचा चारा आणि या सर्व बाबींकरीता आवश्यक असलेला कच्चामाल गोदामे.

पुढील आस्थापना व कार्यालये आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागेल आणि जो पर्यंत पूर्णपणे लसीकरण होत नाही तोपर्यंत संबंधित कर्मचारी यांनी 15 दिवसांसाठी वैध्य असलेला आरटीपीसीआर प्रमाणत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. हा नियम 10 एप्रिल पासून लागू होईल. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर रक्कम 1000 इतका दंड आकरावा. सेबी तसेच सेबी मान्यता प्राप्त संस्था जसे की, स्टॉक मार्केट, डिपॉझिटरीज आणि क्लियरिंग कॉर्पोरेशन आणि सेबीकडे नोंदणीकृत मध्यस्थी. रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली संस्था, प्राथमिक डिलर्स, सीसीआयएल, एनपसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर आणि वित्तीय बजारातील रिझर्व्ह बँकेशी संलग्नीत संस्था. सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे, सर्व मायक्रो फायनान्स संस्था, सर्व वलिकांची कार्यालये, कस्टम हाऊस एजंटस, परवानाकृत मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर (लस, औषध, जीवरक्षक औषधाशी संबंधित वाहतूक) जी व्यक्ती सोमवार ते गुरुवार या दिवशी रात्री 8 ते सायंकाळी 7 आणि शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या कालावधीत ट्रेन, बस, विमान यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असेल अशा प्रवाशांना वैध तिकीटाच्या आधारावर स्थानकापर्यंत किवा घरी प्रवास अनुज्ञेय असेल. औद्योगिक कामगारांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे कंपनीच्या किवा खासगी वाहनाने सोमवार ते शुक्रवार रात्री 8 ते सकाळी 7 आणि शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या कालावधीत कामाच्या पाळ्यानुसार ये जा करता येईल. एखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार असेल तर नियमांचे पालन करुन परवानगी असेल. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास रात्री 8 नंतर किंवा शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या कालावधीत प्रवास करावयाचा असेल तर हॉल तिकीट सोबत बाळगावे लागेल. तसेच परीक्षाकामी निुयक्त करण्यात आलेले सर्व कर्मचारी यांना सोमवार ते गुरुवार या दिवशी रात्री 8 ते सकाळी 7 आणि शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या कालावधीत नियुक्त आदेशाच्या आधारावर प्रवास करण्यास परवानगी असेल.

आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी आणि रविवारी या दिवशी विवाह समारंभास परवानगी देण्यबाबत संबंधित तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण/तहसीलदार यांनी त्यांच्या तालुक्यात कोविड-19 संदर्भात परिस्थिती पाहून कंटेन्मेंट झोन व हॉट स्पॉट वगळून इतर ठिकाणी परवानगी दयायची किंवा नाही याबाबत निर्णय घ्यावा.

सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत फक्त अत्यावश्यक वस्तुंची विक्री करण्याकामी मॉल्स चालू ठेवण्यास परवानगी असेल. अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सेवे व्यतिरिक्त अन्य साहित्य विक्री करण्यास मनाई असेल. सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कलावधीत शेतीमाल अवजारे, वाहन व माल वाहतूक दुरुस्ती उद्योग (उदा. शेती अवजारे, वाहन दुरुस्ती, स्पेअर पार्ट, पंक्चर काढण्याची दुकाने इत्यादी) चालू ठेवण्यास परवानगी.

सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 7 ते रात्री 10 या कालावधीत मेडिकल शॉप्स चालू राहतील. तथापी हॉस्पीटलमध्ये असणारी मेडिकल शॉप्स 24 तास चालू ठेवण्यास परवानगी असेल. संबंधितांनी आरटीपीसीआर प्रमाणपत्र किंवा रॅपिड ॲटीजन टेस्ट प्रमाणपत्र जवळ बाळगणे बंधनकारक राहील.

सातारा जिल्ह्यातील सर्व सेतू कार्यालये सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी राहील. बांधकाम व्यवसायाशी निगडीत दुकानदार यांना बांधकामासाठी आवश्यक असणारे साहित्य सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या बांधकाम साईट/जागा येथे पोहोच करण्यास परवानगी राहील. कंटेन्मेंट झोन व हॉट स्पॉटबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी नर्गमित केलेले आदेश लागू राहतील.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास कायदेशीर कारवाई पोलीस विभागाने करावी, असेही जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश नमूद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!