
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २७ डिसेंबर २०२४ | बारामती |
सैनिक कॅन्टीन, नवी दिल्लीअंतर्गत माजी सैनिक दादासाहेब कोळी यांच्या ‘प्रहरी सैनिक कॅन्टीन’, अवचट इस्टेट, पाटस रिंग रोड, सह्याद्री आयकॉन, बारामती येथे सह्याद्री सोशल फाउंडेशन मेडदचे अध्यक्ष संभाजी माने, सरपंच अर्जुननाना यादव यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत २५ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाले.
सैनिक कॅन्टीन, दिल्ली येथून अत्यंत दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक, जनरल, स्टेशनरी व घरगुती वापराच्या विविध वस्तू फायदेशीर दरात येथे उपलब्ध आहेत. या सेवेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे कॅन्टिनचे व्यवस्थापक स्नेहांकित उर्फ बंटी कोळी यांनी व्यक्त केले.
यावेळी प्राचार्य गिरीश महाले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
