
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण (जि. सातारा) येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाचे उद्घाटन न्यायमूर्ती श्री. प्रकाश नाईक (उच्च न्यायालय, मुंबई) यांच्या हस्ते आणि श्री. विनायक रा. जोशी (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सातारा) यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होत आहे.
हे न्यायालय फलटण येथील जुना राजवाडा इमारत येथे असून उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे.
या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा व अतिरित सत्र न्यायाधीश, फलटण (जि. सातारा) श्री. प्रवीण चतुर व फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अजित चाँद पठाण यांनी केले आहे.
