माकप विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे उद्घाटन


स्थैर्य, मुंबई, दि.८: भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे उदघाटन पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य आणि महाराष्ट्र राज्य सचिव माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र विधिमंडळ विधान भवन प्रशासकीय इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर ” 301 – ड ” हे दालन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये सचिव राजेंद्र भागवत व अवर सचिव रवींद्र जगदाळे यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल कॉम्रेड नरसय्या आडम यांनी महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे आभार केले. यामुळे संसदीय कामकाज करण्यास डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांना नागरिकांचे, शेतकऱ्यांचे व कामगारांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सोयीचे होणार आहे, आडम म्हणाले. माकपचे केंद्रीय कमिटी सदस्य व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. डॉ. अशोक ढवळे म्हणाले की, विधिमंडळ सदस्यांना संसदीय कामकाज करण्यास विधान भवनात पक्ष कार्यालय असणे आवश्यक असून त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास मोठी मदत होणार आहे. याप्रसंगी डहाणू विधानसभा आमदार कॉ. विनोद निकोले म्हणाले की, सभागृहात आदिवासी आणि इतर समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न मी करणार असून या कार्यालयाचा जनसंपर्क आणि पत्रव्यवहार तसेच शासन दरबारी पाठपुरावा करण्यास नक्कीच चांगला उपयोग होईल.

या कार्यक्रमास माकपचे केंद्रीय कमिटी सदस्य तथा अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कमिटी सदस्य तथा अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस कॉ. मरियम ढवळे, महाराष्ट्र राज्य सचिव माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम, पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य तथा ठाणे-पालघर जिल्हा सचिव कॉ. बारक्या मांगात, पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य तथा सीटूचे राज्य सरचिटणीस कॉ. एम. एच. शेख, जमसंच्या राज्य अध्यक्ष कॉ. नसीमा शेख व राज्य सचिव कॉ. प्राची हातिवलेकर, किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य कॉ. चंद्रकांत घोरखाना, डीवायएफयायचे नेते कॉ. डॉ. आदित्य अहिरे, डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले, स्वीय सहाय्यक तथा कार्यालय प्रमुख शाहरुख मुलाणी आदी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!