
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि. १४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करताना कोरोनाच्या काळात रक्ताचा झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून बौद्ध बांधवांच्या वतीने उंब्रज येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचे उदघाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी डी. बी.जाधव, हंबीरराव जाधव, उत्तमराव कांबळे, सरपंच योगराज जाधव, चंद्रकांत जाधव , सोमनाथ जाधव, अजित जाधव, संग्रामसिंह पलंगे, प्रमोद पुजारी, दिगंबर भिसे, नामदेव कांबळे, भिमराव कांबळे, परेशकुमार कांबळे, अतिश बैले आदि उपस्थित होते.
