राजभवन येथील ‘नवीन दरबार हॉल’ उद्‍घाटन सोहळा स्थगित – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२१ । मुंबई । राजभवन येथील नवीन दरबार हॉलचे नियोजित उद्घाटन स्थगित करण्यात आले असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले आहे. संरक्षण दलाच्या हेलीकॉप्टरला झालेल्या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे उद्घाटन आज होणार होते. संरक्षण दलाच्या हेलीकॉप्टरला झालेल्या गंभीर अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींसोबत चर्चा करुन उद्घाटन सोहळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

या सोहळ्यासाठी विशेष उपस्थित निमंत्रितांसमोर प्रत्यक्ष राज्यपालांनी याबद्दल माहिती दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!