‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांची मुलाखत


दैनिक स्थैर्य । दि. ०१ सप्टेंबर २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. 31 ऑगस्ट आणि गुरूवार दि. 1 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेची व्याप्ती, उच्च शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने, नवीन शैक्षणिक धोरणाची गरज, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे, मातृभाषेतील शिक्षण, क्लस्टर युनिव्हर्सिटीची संकल्पना, भारतातील क्लस्टर विद्यापीठे, डॉ. होमी भाभा क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या स्थापनेमागचा उद्देश, या विद्यापीठाची ठळक वैशिष्ट्ये, विद्यापीठाच्या भविष्यातील योजना आदी विषयांची सविस्तर माहिती कुलगुरू डॉ. कामत यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!