भाजपच्या जाहिरातीतील ‘पोस्टर बॉय’ शेतकरी आंदोलनात


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२३: केंद्र
सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सिंघू सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे.
पंजाबमधील शेतकरी हरप्रीतसिंग हेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पण
पंजाबमध्ये या कायद्यांवर भाजपच्या जाहिरातीत हरप्रीतसिंग यांचा फोटो आहे.
म्हणजेच भाजपने ज्या शेतक-याचा फोटो आपल्या जाहिरातीवर लावला आहे, तो
गेल्या २ आठवड्यांपासून सिंघू सीमेवरील नवीन कृषी कायद्यांविरोधातील
आंदोलनात बसला आहे. भाजपने आपल्या फोटोचा बेकायदेशीररीत्या वापर केला आहे,
असा आरोप हरप्रीतसिंग यांनी केला आहे.

हरप्रीत हे पंजाबमधील होशियारपूरचे
रहिवासी आहे. ते व्यवसायाने शेतकरी आहे आणि कलाकारही आहेत. हा फोटो आपण ६-७
वर्षांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. भाजपच्या जाहिरातीत हा फोटो
वापरण्यात आला आहे, असं एका मित्राने व्हॉट्अ‍ॅपवरील चॅटमधून आपल्याला
सांगितलं. फोटो वापरण्यापूर्वी आपली परवानगी घेतली गेली नाही. आता अनेक
आपल्याला फोन करून भाजपचा पोस्टर बॉय म्हणून संबोधत आहेत. पण आपण भाजपचे
नाही तर शेतक-यांचे पोस्टर बॉय आहोत, असं ते सांगत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!