दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
खासदार शरद पवार यांची दोन दिवसात चार शिष्टमंडळांनी भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. यावेळी खासदार पवार यांनी आपल्या भावनांचा विचार केला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याने फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार नवनिर्वाचित असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
खासदार पवार हे कोणता डावपेच कधी खेळतील हे दि. २९ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजताच कळेल. आजपर्यंतचा इतिहास आहे की, पवारसाहेबांची खेळी भल्याभल्यांना आजपर्यंत समजली नाही. एकमात्र निश्चित आहे, फलटण-कोरेगाव मतदारसंघात खासदार पवार ६४ घरांच्या बुध्दीबळाच्या पटलावरील वजीर या प्याद्याचा वापर पद्धतशीरपणे करत आले असल्याने या मतदारसंघातून नवनिर्वाचित उमेदवाराच त्यांच्याकडून दिला जाण्याची शक्यता वाढली आहे.