दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑगस्ट २०२३ | बारामती |
ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन बारामती तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अल्ट्रामॅन अवधूत शिंदे, आयर्नलेडी वैष्णवी ननवरे, स्केटिंग खेळाडू निशांत दोरगे, नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनी सुश्मिता पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सांगता समारंभवेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, मराठा सेवा संघाचे प्रदीप शिंदे, देवेंद्र शिर्के, संभाजी माने, राहुल जगताप, प्रशांत दोडमिसे, प्रवीण मोरे आणि जिजाऊ सेवा संघ बारामतीच्या अध्यक्षा सौ. हेमलता परकाळे, सौ. स्वाती ढवाण उपाध्यक्षा, सौ. सुनंदा जगताप कार्याध्यक्षा, सौ. प्रतिभा बर्गे सहकार्याध्यक्षा, सौ. ज्योती खलाटे सचिव, सौ. सारिका परकाळे – सहसचिव, सौ. संगीता शिरोळे – खजिनदार, सौ. अर्चना परकाळे – सहखजिनदार, सदस्या – सौ. प्रियांका नलवडे, सौ. कल्पना माने, सौ. मनिषा शिंद, सौ. विद्या निंबाळकर, सौ. सारिका मोरे, सौ. ऋतुजा नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
घरगुती खानावळ चालवून मुलांना उच्चशिक्षित करणार्या दुर्गा खानावळच्या संचालिका विमल जाधव यांचा खास ‘कर्तृत्वान उद्योजक महिला’ म्हणून सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या प्रायोजक महिलांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
रजनीदेवी दोडमिसे व त्रिंबकराव दोडमिसे यांच्या लग्नाच्या ५० वाढदिवसानिमित्त इयत्ता ५ वी मधील विद्यार्थिनी कु. राधिका बबन डेरे हिला सायकल देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रदर्शन व पुरस्काराच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक धाडस वाढावे व आर्थिक सक्षम होण्यासाठी पुढे यावे म्हणून सदर उपक्रम राबवित असल्याचे जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा हेमलता परकाळे यांनी सांगितले.