रणजितदादांच्या माध्यमातून डोंबाळवाडीतील स्मशानभूमी सुशोभीकरणाचा शुभारंभ; ग्रामस्थांना दिलासा

डोंबाळवाडी येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ झाला. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी निधी दिल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला.

स्थैर्य, फलटण, दि. २८ जून : फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी येथील अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरण कामाचा अखेर शुभारंभ करण्यात आला. जल सुविधा विशेष अनुदान योजनेतून सुरू झालेल्या या कामामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर होऊन त्यांना दिलासा मिळाला आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सचिन पाटील यांच्या शिफारशीतून या कामासाठी विशेष निधी उपलब्ध झाला आहे. अनेक वर्षांपासून येथील स्मशानभूमी दयनीय अवस्थेत होती. पावसाळ्यात व इतर वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

ग्रामस्थांकडून आभार व्यक्त

ग्रामपंचायत सदस्य तुषार पिसाळ आणि प्रशासक पांडुरंग कोळपे यांच्या हस्ते या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दत्तात्रय डोंबाळे आणि बाळू यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्मशानभूमीच्या विकासासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे आभार मानले आहेत.

Back to top button
Don`t copy text!