गिरवीतील गोपालकृष्ण मंदिरात राष्ट्रसंत प.पू. गोविंदगिरी स्वामी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
राष्ट्रसंत पूज्य गोविंदगिरी स्वामीजी (किशोरजी व्यास) यांचा वाढदिवस श्री. गोपालकृष्ण मंदिर देव ट्रस्ट गिरवी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प.पू. गोविंदगिरी स्वामी हे अयोध्या राम मंदिर न्यासाचे प्रमुख विश्वस्त असून मथुरा सेठी कृष्ण मंदिर न्यासाचेही विश्वस्त असून गोपालकृष्ण मंदिर गिरवी त्यांचे श्रध्दास्थान आहे.

फलटण व पुणे येथील साधकांनी गोपालकृष्ण मंदिर येथे सकाळी रुद्र, पवमान, अभिषेक, सौरसुक्त पठन करून पूज्य स्वामी यांना दिर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना यावेळी केली. तसेच गीता व विष्णूसहस्त्रनामाचे पठण करण्यात आले. यावेळी साधकांनी या जागृत मंदिराचे आलेले अनुभव तसेच लाभ कसा झाला, याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

मंदिराचे प्रमुख विश्वस्त श्री. जयंतराव देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Back to top button
Don`t copy text!