कर्तव्यावर मृत्यू झाल्यास कोविड योध्द्यांना शहिदांचा दर्जा द्या : दरेकर


स्थैर्य, मुंबई, दि. ८: कोरोना काळात सेवा देताना मृत्युमुखी पडलेले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार या कोविड योध्द्यांना शहिदांचा दर्जा द्यावा. तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करुन त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी सभागृहात केली. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर सहवेदना मांडताना दरेकर यांनी ही मागणी केली. 

‘आपली काहीही चूक नसताना, कोरोनाग्रस्तांना सेवा देताना, मदत करताना ज्यांचे निधन झाले. असे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस बांधव आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय वा-यावर आले आहे. त्यांना शासनाने आर्थिक मदत शासनाने करणे आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. या कोविड योध्द्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबातील कमविता व्यक्ती गमाविल्यामुळे त्या कुटुंबातील एका सदस्याला संबंधित मृत व्यक्तीच्या ठिकाणी शासकीय नोकरीत सामावून घेण्याची विनंतीही दरेकर यांनी केली. 

पांडुरंग रायकर यांना ५० लाखाचा विमा द्या 

पत्रकार पुण्यात पांडुरंग रायकर यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे रायकर यांच्या कुटुंबियांना ५० लाखांचा विमा त्वरित देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!