दैनिक स्थैर्य | दि. ५ डिसेंबर २०२३ | फलटण |
सरडे (ता. फलटण) गावच्या हद्दीत संशयित आरोपीच्या घराच्या आडोशाला २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजता पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हातभट्टीच्या बनावट देशी दारूच्या १२ बॉटलसह एकूण ८४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आप्पा यशवंत जाधव (रा. सरडे, ता. फलटण) याच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक तपास पो.ह. अभंग करत आहेत.