दैनिक स्थैर्य | दि. 04 जानेवारी 2024 | फलटण | माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडचणींचा निपटारा करण्यासाठी माहे जानेवारी 2024 मध्ये कल्याण संघटकांच्या तालुका दौऱ्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी कळविले आहे.
हा दैारा पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 9 जानेवारी 2024 रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, कराड (श्री. गोरखनाथ जाधव कल्याण संघटक मो. नं. 7889661527), मंगळवार दि.16 जानेवारी 2024 रोजी तहसिल कार्यालय, माण (खटाव) (श्री. सी.टी. पवार,कल्याण संघटक मो. नं. 7756911999), शुक्रवार दि.19 जानेवारी 2024 रोजी तहसिल कार्यालय, फलटण (श्री. आर.एम.जाधव कल्याण संघटक मो. नं. 7798422366)
तरी या संधीचा लाभ संबधित तालुक्यातील लाभार्थ्यानी घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.