हरीश काकडे यांची राष्ट्रवादी सामाजिक न्यायच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड


दैनिक स्थैर्य | दि. 04 जानेवारी 2024 | फलटण | येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे खंदे समर्थक हरीश काकडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) सामाजिक न्याय विभागाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याहस्ते मुंबई येथे हरीश काकडे यांना सुपूर्त करण्यात आले आहे.

यावेळी प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, प्रवक्ते आनंद परांजपे, फलटणचे माजी नगरसेवक सनी अहिवळे, सामाजिक कार्यकर्ते सनी काकडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!