स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुकेने मरण्यापेक्षा घरी जाऊन मेलो तर कुटुंबाला दर्शन होईल

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
ADVERTISEMENT

स्थैर्य, खटाव, दि. 25 : धोंडेवाडी ता खटाव येथे बांधकाम व्यवसाय करण्यासाठी छत्तीसगड राज्यातील सुमारे पंधरा पुरुष महिला मजूर आले होते. बांधकामास सुरुवात होण्याअगोदरच लॉकडाऊन जाहीर झाले. सध्या या मजुरांच्या हाताला काम ही नाही अन पोटाला खायला अन्न नाही. आशा हलकीच्या परिस्थितीत त्यांनी परत गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ट्रेन व इतर तांत्रिक अडचण मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे इकडे भुकेने मारण्यापेक्षा गावाकडे जाऊन मरण आले तर आई वडील व इतर नातेवाईकांना अंत्यदर्शन तरी घेता येईल अशी संतप्त प्रतिक्रिया या मजुरांकडून व्यक्त होत आहे.

सदरचे कामगर गेले दोन महिने लॉक डाऊन मुळे अडकून पडले आहेत. या कामगारांमध्ये पाच ते सहा पुरुष आठ महिला व सहा लहान बाल्कनाचा समावेश आहे. ते सर्व जण धोंडेवाडी येथून वडूज तहसिल कार्यलयापर्यंत चालत आले आहेत. त्यांनी कार्यालयाच्या आवारातील पिटीशीयन रायटर च्या बराकीत आपला मुक्काम ठोकला आहे. या ठिकाणी शिवभोजनच्या माध्यमातून त्यांची जेवणाची सोय होत आहे. मात्र पिण्याच्या पाण्याची व अंघोळची  गैरसोय आहे.   तसेच उन्हाळ्याचे दिवस व पत्र्याच्या शेड मध्ये लहान मुलांना उकड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. झोपलेल्या चिमुकल्यांना साडीच्या पदराने माउलीला वारा घालावा लागत आहे. शासकीय इतमामाने घरी जाण्यासंदर्भात कधी उपाययोजना होईल हे सांगता येत नाही.  या कामगारांना धड लिहता वाचता येत नाही. शिवाय मराठी बोलता येत नाही त्यामुळे ते पूर्णपणे वैतागून गेले आहेत. तर महसूल व पोलीस प्रशासन सांगतय की त्यांची ट्रेन रद्द झाली आहे त्या मजुरांनी पुन्हा धोंडेवाडीतच जावे. त्यांची सर्व प्रकारची राहण्या जेवणाची व्यवस्था करण्यासंदर्भात गाव कामगार तलाठ्यांना सूचना देण्यात अली आहे.  अशा परिस्थितीत आता त्या कामगारांना आपल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन  धोंडेवाडीला जायचे म्हटले तर पुन्हा सुमारे ३० किलोमीटर ची पायपीट करावी लागणार आहे.या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मुकादम जुगणु पात्रे म्हणाले हमे मराठी नहीं आती… हम पढे लिखे नहीं… मुंगेली(छत्तीसगड) से बांधकाम के लिए एक काँट्रॅकटर के साथ आये थे.. ओ काँट्रॅकटर हमे यहा छोडकर वापस चला गया… यहा आने के बाद दो दिन मे लॉक डाऊन हो गया उधर कोई काम ही नही तो दाम और अनाज का सवाल ही नही है . यहा भुका मरने के पाहिले हमारे गाव जाकर मरे तो अछा होगा. उधर माँ बाप और घर वाले तो अंत्यदर्शन लेंगे…. अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.


Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

करोनाच्या उच्चाटनासाठी भक्तांनी केला जप

Next Post

शहरात मात्र कसलीही कोरोनाची धास्ती नसल्याचे बिकट चित्र

Next Post

शहरात मात्र कसलीही कोरोनाची धास्ती नसल्याचे बिकट चित्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

फलटण – लोणंद रोडवर अपघात; दोघे जखमी

March 5, 2021

आई-वडिल मारतील म्हणून घरात चोरी झाल्याचा बनाव, अकरा वर्षाच्या मुलाचा प्रताप

March 5, 2021

कोल्हापूर, बारामतीतील उद्योजकांवर हनी ट्रॅप

March 5, 2021

पतीला मारहाण, पत्नीचा विनयभंग

March 5, 2021

हलगर्जी मृत्यूप्रकरणी गुन्हा

March 5, 2021

ग्रेड सेप्रेटरमध्ये स्टंटबाजी अंगाशी आलीदुचाकीस्वार युवकावर गुन्हा दाखल 

March 5, 2021

परदेशी नागरिक कायदा उल्लंघनप्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर पाचगणी पोलिसांत गुन्हा 

March 5, 2021

विवाहितेचा जाचहाटप्रकरणी पतीसह सासरच्या 6 जणांवर गुन्हा 

March 5, 2021

गोडोली येथून दुचाकी चोरीस

March 5, 2021

कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशीपऐवजी स्व-वर्गीकरण करण्यावर भर : केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर

March 5, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.