मलठणमधील चोर्‍यांचे प्रमाण न थांबल्यास फलटण शहर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार – अशोकराव जाधव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहराच्या मलठण भागामध्ये गेल्या चार-पाच दिवसात तीन ते चार घरफोड्या भरदिवसा झाल्या आहेत. त्याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन येथे ‘एफआयआर’ नोंद करण्यात आली असून अद्यापही या घरफोड्यांच्या तपासात प्रगती दिसत नाही. या भागात नेहमीच चोर्‍या होत असतात. पोलीस स्टेशनला संपर्क केल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

मलठणसाठी नवीन पोलीस मदत केंद्र मंजूर होऊन तसेच ते बांधूनसुद्धा गेली सहा महिने तयार आहे. तरीही पोलीस स्टेशनमार्फत या ठिकाणी कोणीही कर्मचारी दिले गेलेले नाहीत. त्यामुळे ते बंद अवस्थेत आहे व चोर्‍यांचे प्रमाण रोजच वाढत आहे. वरिष्ठांनी याची दखल न घेतल्यास येत्या १५ ऑगस्टनंतर फलटण शहर पोलीस स्टेशनवर सर्व मलठणकरांचा मोर्चा काढण्यात येईल. याची दखल फलटण शहर पोलीस स्टेशन व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घ्यावी व लवकरात लवकर चोरांचा बंदोबस्त करावा, अशी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!