स्थैर्य, दि.१३: आज भाजपच्या ओबीसी
कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. ‘मराठा समाजाला
स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. पण, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला, तर
रस्त्यावर उतरू’, असा इशारा फडणवीसांनी दिला.
भाजपच्या
ओबीसी कार्यकारिणीच्या बैठकीत संबोधित करताना फडणवीस पुढे म्हणाले की,
‘मराठा समाजाला आरक्षण देताना त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का दिला जाणार
नाही, याबाबतचे कलम आम्ही टाकले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला
स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे
आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिले आहे. त्यामुळे, ओबीसी आरक्षणात वाटेकरी
स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा,
रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा फडणवीस यांनी दिला.