उद्यापासून सुरू होणार राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, दि.१३: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी
अधिवेशन सुरु होत आहे. २ दिवसांचेच हे अधिवेशन असून त्यात पुरवणी मागण्या
मांडून आणि दिवंगत आजी-माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहून पहिल्या दिवसाचे
कामकाज संपेल. त्यामुळे अधिवेशनाला केवळ एकच दिवस मिळणार आहे. प्रमुख
विरोधी पक्ष भाजपकडे सरकारला घेरण्याची संधी कमीच असेल. त्याचवेळी
विधानपरिषद निवडणुकीच्या विजयाने आत्मविश्वास वाढलेले सरकार अधिवेशनाची
औपचारिकता पूर्ण करेल.

राज्यात
कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे, ही सरकारसाठी जमेची बाजू असेल.
महाविकास आघाडी सरकारला अलीकडेच १ वर्षे पूर्ण झाले. तिन्ही पक्षांमध्ये
एकी असल्याचे विधानपरिषद निवडणूक निकालातून दिसले.
अधिवेशनातही तसेच चित्र बघायला मिळेल, असे दिसते.

हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची प्रथा मात्र…!

विधिमंडळ
अधिवेशनाला कोरोनाचा फटका बसला आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्‍पीय अधिवेशन
सुरू असताना कोरोनाचा प्रसार नुकताच सुरू झाला त्यामुळे हे अधिवेशन
गुंडाळावे लागले होते. पावसाळी अधिवेशनही लांबले व ते सप्टेंबरमध्ये
घेण्यात आले. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची प्रथा आहे. मात्र,
कोरोनाचे सावट लक्षात घेता, मुंबईतच हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय कामकाज
सल्‍लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हे अधिवेशनही ७ डिसेंबरला
घेण्यात येणार होते. मात्र, आता १४ आणि १५ डिसेंबर असे २ दिवस हे अधिवेशन
होणार आहे. या अधिवेशनात महिला, बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात शक्ती
कायद्याचे विधेयक मांडण्यात येणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!