महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता : निलेश राणे


 

स्थैर्य, दि.२१: अयोध्येतील राम मंदिराच्या
मुद्यावरून शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजप सरकारवर निशाणा साधला. राम
अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी
आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून
बांधायचे? असा सवाल अग्रलेखातून केला आहे. यावर भाजपचे नेते निलेश राणे
यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

…तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता

निलेश
राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संजय राऊत यांच्या टीका केली आहे.
शिवसेनेने लाज सोडली. शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा
आयुष्य भर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला
असता. असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

ज्यांचे
घर वर्गणीतून चालते तेच मंदिर वर्गणीतून बांधणार काय असे विचारत आहेत.
जनाची नाही पण किमान मनाची तरी ठेवा. अशा शब्दांत निलेश राणे यांनी संजय
राऊतांवर सडकून टीका केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!