मी फक्त शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा पाईक – राजाभाऊ निकम


दैनिक स्थैर्य | दि. २० एप्रिल २०२४ | फलटण |
मी फक्त आणि फक्त दैवत शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांचा पाईक आहे आणि माढ्यातून त्यांनी उमेदवारी दिलेल्या धैर्यशील मोहिते-पाटील यांनाच पाठिंबा देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश चिटणीस राजाभाऊ निकम यांनी केले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार साहेब यांनी श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील शरद पवारप्रेमी जनता धैर्यशील मोहिते-पाटील यांनाच मतदान आणि पाठिंबा देईल. पवासाहेब यांच्या नावावर जोगवा मागायचा आणि अडचणीच्या वेळी पळून जायचं, असले काम मी करत नाही. लोकशाही आहे, कुणालाही उमेदवारी दाखल करण्याचा अधिकार आहे, पण यापुढे उमेदवारी दाखल करणार्‍या आणि त्यांना फूस लावणार्‍या लोकांनी परत साहेबांचे नाव घेवू नये, असा इशाराही राजाभाऊ निकम यांनी दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!