मी श्रीमंत रामराजेंचाच कार्यकर्ता : यशवंत नलवडे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 27 जानेवारी 2024 | फलटण | मी एका खाजगी कार्यक्रमात गेलो असता. माझा फोटो काढला व मी प्रवेश केला अशी बातमी सोशीयल मिडीया वर व्हायरल केली, परंतु मी विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. तरी व्हायरल झालेली बातमी चुकीची असून, मी राजे गट, राष्ट्रवादी पक्षाचे काम करत आहे व इथून पुढे राजे गटाचे काम करणार आहे; असे मत कुरवली बु.|| चे ग्रामपंचायत सदस्य यशवंत नलवडे यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी बाजार समितीचे संचालक शंभूराज पाटील व राजकुमार बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!