हॉटेल ‘एम.एच.11 राजधानी सातारा’ ग्राहकांच्या पसंतीस उतरेल : श्रीमंत संजीवराजे


दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२१ | फलटण | मराठी तरुणांनी हॉटेल व्यवसायात उतरुन आपले वेगळे अस्तित्व निर्माण करावे. एम.एच.11 राजधानी सातारा या हॉटेलची फलटणमध्ये योग्यवेळी सुरुवात झाली असून हा व्यवसाय अल्पकाळात वृद्धींगत व्हावा अशा सदीच्छा आहेत. उत्तम सेवेच्या जोरावर हे हॉटेल लवकरच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्‍वास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

फलटण येथील फलटण – सातारा रोड येथे बेरोजगार तरुणांनी जिद्द, चिकाटी व अनुभवाच्या जोरावर हॉटेल व्यवसायात पाऊल टाकले आहे. या हॉटेलचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे, विवेक शिंदे, अमरसिंह खानविलकर, वाठार निंबाळकरचे माजी सरपंच अशोकराव निंबाळकर, शिक्षक नेते संतोष निंबाळकर, एक्साइज इन्स्पेक्टर अभयकुमार साबळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या हॉटेलमध्ये ग्राहकांच्या मनपसंत शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय केली जाणार आहे. तसेच स्पेशल म्हणून मच्छी थाळी याठिकाणी उपलब्ध असणार आहे. तरी सर्व सर्व खवय्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन, अशोकराव निंबाळकर यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनकृष्णात कुंभार यांनी केले तर आभार राजेंद्र पवार यांनी मानले.

कार्यक्रमास केंद्रप्रमुख, शिक्षक बँकेचे आजी माजी संचालक, सर्व संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच वाठार निंबाळकर, जाधववाडी येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!