रुत्विक माळवे यांचा प्रामाणिकपणा : सापडलेले १५ हजार रूपये केले परत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण येथील सेंट्रींग व्यावसायिक नितिन दशरथ कापसे (वय ४३, रा. झिरपवाडी) यांचे १५ हजार रुपये गोल्डन बेकरी जवळ पडले होते. ते येथील प्रसिद्ध फोटोग्राफर रुत्विक शिरिष माळवे यांना सापडले. त्यांनी कुणाचे पैसे पडले का? म्हणून आसपास विचारपूस केली असता, लगेचच गोल्डन बेकरीचे सीसीटिव्ही फुटेज तपासून कुणाचे पैसे पडलेत ती फुटेज प्रसारित केली असता तीन-चारजणांनी नितिन कापसे यांना फोन करून तुमचे पैसे पडल्याचे फुटेज दिसत असल्याचे सांगितले. तात्काळ त्यांनी संपर्क करताच फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरज शिंदे आणि दैनिक लोकमतचे तालुका प्रमुख आणि नगरसेवक अजय माळवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये १५ हजार रुपये नितिन कापसे यांना परत देण्यात आले.

रुत्विक माळवे यांच्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Back to top button
Don`t copy text!