गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली


दैनिक स्थैर्य । दि.०५ जानेवारी २०२२ । मुंबई । निराधारांचा आधार आणि अनाथांची आई बनून समाजासाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आकस्मिक निधन अतिशय दुःखदायक आहे. त्यांनी वात्सल्याची पाखर घालून मुख्य प्रवाहात आणलेल्या हजारो मुलांच्या आयुष्यातील प्रकाश बनून त्या नेहमी उजळत राहतील. अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.


Back to top button
Don`t copy text!