स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाल किल्ला परिसरातील उपद्रवानंतर अनेक भागातील इंटरनेट बंद, गृहमंत्री अमित शाहांनी बोलावली आपत्कालीन बैठक

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 26, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य , नवी दिल्ली, दि .२६: दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात चांगलाच गदारोळ झाला. शेतकऱ्यांना दिल्लीतून पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला. यानंतर शेतकऱ्यांनी उपद्रव आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. वाढता तणाव पाहून अफवा पसरू नये यासाठी परिसरातील इंटरनेट सेवा तात्पूर्ती बंद करण्यात आली आहे. दरम्यान शेकडो आंदोलनकर्ते अद्यापही लाल किल्ला परिसरात उपस्थित आहेत. दुसरीकडे हाताबाहेर जाणारी परिस्थिती पाहता गृहमंत्री अमित शहा यांनी आपत्कालीन बैठक बोलविली आहे. या बैठकीत दिल्ली पोलिस, गुप्तचर आणि गृह मंत्रालयाचे उच्च अधिकारी उपस्थित आहेत.

अपडेट्स…

> सरकारने सिंघू, टिकरी, गाझीपूर सीमा तसेच मुकरबा चौक आणि नांगलोई भागातही इंटरनेट बंद केले आहे. या भागातच शेतकरी आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे दिल्ली मेट्रोने ITO, दिलशान गार्डन, झिलमिल, मानसरोवर पार्क आणि जामा मशीद स्टेशन बंद केले आहेत.

> संयुक्त किसान मोर्चाने म्हटले की, ‘आमच्या प्रयत्नांना न जुमानता काही संघटनांनी आणि लोकांनी निश्चित मार्ग तोडला आणि चुकीच्या कामात सामील झाले. आंदोलन शांततेत सुरू होते, पण काही समाजकंटक या आंदोलन घुसले. आम्ही नेहमीच शांतता कायम ठेवली आहे, जी आमची सर्वात मोठी ताकद होती आणि याचे उल्लंघन केल्याने आंदोलन कमकुवत होऊ शकते.’

> याआधी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर दाखल झाले आणि खालसा पंथ आणि किसान संघटनांचा झेंडा फडकवला. जेथे तिरंगा कायम तिरंगा असतो तेथेही निदर्शकांनी त्यांचे झेंडे लावले. दरम्यान त्यांनी तिरंग्याला हटवले नाही.

.

दिल्लीत दाखल झाल्यानंतर एका आंदोलकाने लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकवल्या जाणाऱ्या ठिकाणी खासला झेंडा लावला.
दिल्लीत दाखल झाल्यानंतर एका आंदोलकाने लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकवल्या जाणाऱ्या ठिकाणी खासला झेंडा लावला.

दुसरीकडे ITO जवळ पोलिसांसोबतच्या झडपेत वेगात ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटल्याने मृत्यू झाला आहे. नवनीत सिंग असे या मृताचे नाव होते. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता.

दिल्ली आयटीओजवळ एका शेतकऱ्याच्या मृत्यूचे वृत्त आहे. पोलिसांनानुसार, ट्रॅक्टर पलटल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
दिल्ली आयटीओजवळ एका शेतकऱ्याच्या मृत्यूचे वृत्त आहे. पोलिसांनानुसार, ट्रॅक्टर पलटल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

लाठीचार्ज, दगडफेकीत अनेक शेतकरी व पोलिस जखमी झाले

ITO पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला असता शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या झडपमध्ये अनेक शेतकरी आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर वेगाने चालवले असता पोलिसांना मागे हटावे लागले. पोलिसांनी तेथून पळ काढत जवळच्या इमारतींमध्ये गेले आणि तेथून शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा केला.

नोएडाच्या पांडवनगरमध्ये शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. काही गाड्यांची तोडफोड देखील केली. यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला.
नोएडाच्या पांडवनगरमध्ये शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. काही गाड्यांची तोडफोड देखील केली. यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला.

निहंग्यांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला – पोलिसांचा दावा

याआधी गाझीपूर सीमेवरून निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी नोएडा रोडवर अडवले आणि अश्रुधुराचा मारा केला. शेतकऱ्यांनी देखील पोलिसांवर दडफेक केली आणि काही गाड्यांची तोडफोड केली. दरम्यान शेतकऱ्यांनी पांडवनगर पोलिस पिकेटवर ट्रॅक्टर चढवल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. तसेच निहंग्यांनी तलवारीने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

अक्षरधामजवळ बॅरिकेड पार करताना आंदोलक, यावेळी अनेक निहंग देखील तलवारीसोबत फिरताना दिसले.
अक्षरधामजवळ बॅरिकेड पार करताना आंदोलक, यावेळी अनेक निहंग देखील तलवारीसोबत फिरताना दिसले.
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या नांगलोईमध्ये पोलिसांचे जवान रस्त्यावर बसले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने महिला कर्मचारी देखील आहेत.
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या नांगलोईमध्ये पोलिसांचे जवान रस्त्यावर बसले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने महिला कर्मचारी देखील आहेत.
दिल्लीच्या नांगलोईजवळ शेतकऱ्यांना रोखण्यासाठी जे बॅरिकेड्स लावले होते, शेतकऱ्यांनी ते देखील तोडले.
दिल्लीच्या नांगलोईजवळ शेतकऱ्यांना रोखण्यासाठी जे बॅरिकेड्स लावले होते, शेतकऱ्यांनी ते देखील तोडले.
पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून शेतकऱ्यांचा एक ताफा दिल्लीतील लाल किल्ल्यापर्यंत पोहोचला.
पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून शेतकऱ्यांचा एक ताफा दिल्लीतील लाल किल्ल्यापर्यंत पोहोचला.
गाझीपूर सीमेजवळ शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे टाकले, मात्र शेतकरी थांबले नाही.
गाझीपूर सीमेजवळ शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे टाकले, मात्र शेतकरी थांबले नाही.
दिल्लीच्या अक्षरधामजवळ रस्त्यावरील दुभाजक तोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करताना आंदोलक शेतकरी
दिल्लीच्या अक्षरधामजवळ रस्त्यावरील दुभाजक तोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करताना आंदोलक शेतकरी
दिल्लीच्या स्वरूप नगरमध्ये लोकांनी शेतकऱ्यांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. ही जागा सिंघू सीमेपासून जवळपास 14 किलोमीटर पुढे आहे.
दिल्लीच्या स्वरूप नगरमध्ये लोकांनी शेतकऱ्यांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. ही जागा सिंघू सीमेपासून जवळपास 14 किलोमीटर पुढे आहे.

पोलिसांनी दिलेला मार्ग शेतकर्‍यांनी अवलंबला नाही

पोलिस शेतकऱ्यांना म्हणाले होते की, प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर 12 वाजता ट्रॅक्टर मोर्चा काढवा. मात्र शेतकऱ्यांना परेड संपण्याआधीच मोर्चा काढला. बॅरिकेड तोडून शेतकरी पुढे सरसावले आणि आता ते पोलिसांनी दिलेल्या मार्गावर देखील जात नाहीत. पोलिस देखील मागे हटली आहे.

मोर्चात एक लाख ट्रॅक्टर असल्याचा शेतकऱ्यांचा दावा

पोलिसांनी शेतकऱ्यांना केवळ 5 हजार ट्रॅक्टरसोबत रॅली काढण्याची मंजुरी दिली आहे. मात्र एकट्या सिंघू बॉर्डवर 20 हजारांपेक्षा जास्त ट्रॅक्टर दाखल झाले. याआधी सिंघू, टीकरी आणि गाझीपूरवर सुमारे 1 लाख ट्रॅक्टर जमा होणार असल्याचा शेतकऱ्यांनी दावा केला होता.


ADVERTISEMENT
Previous Post

बुलेट ट्रेन दिल्यामुळे केंद्र सरकारने जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार दिला असावा; शिवसेना खासदार संजय राऊतांची टीका

Next Post

तिसऱ्या तिमाहीच्या कंपनी निकालांनी दिले अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत

Next Post

तिसऱ्या तिमाहीच्या कंपनी निकालांनी दिले अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत

ताज्या बातम्या

IPL वेळापत्रक जाहीर : 9 एप्रिलपासून होणार आपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात

March 7, 2021

‘ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला, त्यांचे स्वप्न भंग केले’ – पंतप्रधान मोदी

March 7, 2021

परिवर्तन बंगालमध्ये नाही, दिल्लीत होणार; भाजपकडून पैसे घ्या आणि तृणमूलला मतदान करा – ममता बॅनर्जी

March 7, 2021

11 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान अंशतः लॉकडाउन; जाहीर सभा, आठवडी बाजारासह शाळा-महाविद्यालये बंद

March 7, 2021

‘साधनेद्वारे आत्मतेज जागवणे’, हे खरे सबलीकरण !

March 7, 2021

आंतरराष्ट्रीय महिलादिनी ‘ट्रेल’चा ‘मॉमप्रेनर्स’च्या कार्याला सलाम

March 7, 2021

‘आई मला माफ कर…’ अधिकारी तरुणीची भंडाऱ्यात आत्महत्या

March 7, 2021

रिलायंस समूहातील सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत लस; लसिकरणाचा खर्च कंपनी उचलणार

March 7, 2021

दहावी-बारावी सीबीएसई परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, सुधारीत वेळापत्रक सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध

March 7, 2021

क्रूड उत्पादनात कपात सुरूच; पेट्रोल-डिझेल आणखी महाग‌!

March 7, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.