दहिवडीत घरगुती वीजबिलांची होळी ग्राहक प्रबोधन समितीचे महावितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन


 

    एकदिवसीय ठिय्या आंदोलनात सहभागी झशलेले ग्राहक प्रबोधन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.


स्थैर्य, दहिवडी दि.६ : महावितरणकडून जनतेला देण्यात आलेल्या वाढीव वीजबिलाच्या निषेधार्थ ग्राहक प्रबोधन समितीच्यावतीने दहिवडी येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर वीजबिलाची होळी करुन एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

कोरोना महामारीने नागरिक आधिच आर्थिक संकटात असताना महावितरणकडून वाढीव वीजबिले देण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कुठलेही रिडिंग न घेता महावितरणने घरगुती वीज वापर करणार्‍या ग्राहकांना हजारो रुपयांची अव्वाच्या सव्वा वीजबिले पाठवली व ती भरावीच लागतील असे सांगितले. याविरोधात ग्राहक प्रबोधन समितीच्यावतीने महावितरणच्या कार्यालयासमोरच वाढीव वीजबिलाची होळी करत महावितरणच्या लुटीचा निषेध करत एकदिवसीय आंदोलन केले. ‘‘वाढीव विजबीलासंबधी ग्राहकांच्या समस्येचे निरसन करण्यात येईल’’, असे महावितरणच्या अधिकार्‍यांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

यावेळी ग्राहक प्रबोधन समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र मुळीक, सौ शारदा भस्मे, एकनाथ वाघमोडे, वैभव जाधव, आकाश मुळीक, शंभूराज जाधव, विक्रम जाधव, शंकर मुळीक, आशिष पवार, ज्ञानेश्‍वर घाडगे, गंगाराम गोडसे, आशिष मुळीक, अनिकेत शिंदे, सुरज कदम, शुभम खाडे, सागर जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!