खटके वस्ती येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात लोखंडी गज, लाकडी दांडक्यांनी जोरदार मारामारी; ११ जणांवर गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य | दि. १६ मार्च २०२३ | फलटण |
खटकेवस्ती ता. फलटण जि. सातारा गावचे हद्दीतील चावाळ नावाचे शेतात जमिनीच्या कारणावरून झालेल्या वादात दोन कुटुंबात लोखंडी गज, सत्तूर, लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी जोरदार मारामारी झाली आहे. या प्रकरणी दोन्ही कुटुंबांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून सुमारे ११ जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणाची अधिक माहिती अशी, खटकेवस्ती ता. फलटण जि. सातारा गावचे हद्दीतील चावाळ नावाचे शेतात बुधवार, १५ मार्च रोजी सकाळी ९.०० ते १०.०० वाजण्याच्या सुमारास अक्षय बापुराव खटके (वय ३२) हे मिरची पिकाला पाणी देणे करिता गेले होते. तेव्हा जमीन गट नंबर ८४ मधील शेतात राजेंद्र गुलाब जरांडे हे ट्रॅक्टर घेऊन आले असताना सामाईक बांधावरून या दोघांमध्ये वाद होऊन दोन्ही (वय ४९, रा. खटके वस्ती, तालुका फलटण) कुटुंबात लोखंडी गज, सत्तूर, लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी जोरदार मारामारी झाली.

या प्रकरणी दोन्ही कुटुंबांकडून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी राजेंद्र गुलाब जरांडे, निलेश राजेंद्र जरांडे, मेघा राजेंद्र जरांडे, नेहा राजेंद्र जरांडे (सर्व राहणार खटके वस्ती, तालुका फलटण), नितीन सोपान गावडे (राहणार पंचबिगा गोखळी, तालुका फलटण) तसेच बापूराव उर्फ अजित सोपान खटके, संग्राम बापूराव उर्फ अजित खटके, अक्षय बापूराव उर्फ अजित खटके, आनंदराव सोपान खटके, सागर आनंदराव खटके व उज्ज्वला बापूराव उर्फ अजित खटके (सर्व राहणार खटके वस्ती, तालुका फलटण, जिल्हा सातारा) या ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!