दैनिक स्थैर्य | दि. २३ जून २०२३ | फलटण |
ब्राह्मण युवा संघ फलटण यांच्यातर्फे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्यांसाठी फलटण येथे आरोग्य तपासणी घेण्यात आले. या शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
सदर शिबीर ओंकार अपार्टमेंट, ब्राह्मण गल्ली, फलटण येथे आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन डॉ. अवधूत गुळवणी यांच्या हस्ते झाले. या शिबिरास ८०० वारकर्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे व दोनशे बॉक्स पाणी बाटल्या वाटप करण्यात आल्या. यावेळी एक लाख किमतीच्या औषधांचे वितरण करण्यात आले.
या शिबीरास दिवसभर डॉ. जयंत जगदाळे, डॉ. प्राची जोशी, डॉ. युवराज नलावडे, डॉ. श्रीपाद चिटणीस, डॉ. सचिन शिंगाडे, डॉ. सचिन नाळे आणि डॉ. डी. जी. देशपांडे, डॉ. सुहास म्हेत्रे, डॉ. सईश भुजबळ, डॉ. व्ही. रा. त्रिपुटे, डॉ. विशाल बुरूंगले या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले.
या शिबिरास अन्न व औषध प्रशासन निरीक्षक पाटील यांनी भेट दिली. फलटण तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम धुमाळ व त्यांचे पदाधिकारी, महावीर मेडिकलचे निलेश दोशी व मिलिंद नेवसे यांनी भेट देऊन कौतुक केले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैभव विष्णूप्रद, सचिन कुलकर्णी, अनिरुद्ध इनामदार, अमेय चिटणीस, निरंजन क्षीरसागर, अमोद कुलकर्णी, निखिल केसकर, स्वानंद जोशी व युवक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.