दैनिक स्थैर्य | दि. 15 जानेवारी 2024 | फलटण | फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर, मठाचीवाडी येथे दि.१२ जानेवारी उद्यानकन्यांद्वारे मुलींचे आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आले.
हा उपक्रम प्रमुख पाहुणे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.एस.डि.येळे तसेच गावच्या सरपंच सौ.जयश्री भोसले व इतर आरोग्य सहकारी यांच्या उपस्थित मध्ये पार पडला. या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण अणि कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी. पाटील व प्रा. जे. व्ही. लेंभे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या स्नेहल निकम, प्रज्ञा देशमुख, नम्रता ढोपरे, वैभवी रणवरे, गायत्री शेडगे, अस्मिता शिंदे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.