दैनिक स्थैर्य | दि. 15 जानेवारी 2024 | फलटण | स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक शूर वीरांना सोबत घेऊन रयतेच्या राज्याची स्थापना केली. यामध्ये नरवीर जिवा महाले यांची भूमिका महत्वपूर्ण होती. अफजलखान भेटी वेळी वीर जिवा महाले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून सोबत होते. सय्यद बंडाचा वध करत महाराजांचे केलेल रक्षण आजही आपल्या सर्वांसाठी शूरतेचे प्रतिक मानलं जात. म्हणूनच म्हणतात “होते जिवाजी; म्हणून वाचले शिवाजी” असे वक्तव्य नरवीर जिवाजी महाले यांच्या पुण्यतिथी निमित्त संत सावता माळी मंदिर येथे त्यांना अभिवादन करताना जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोविंद भुजबळ, विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बापूराव शिंदे, कोळकीचे माजी उपसरपंच वैभव नाळे, जाधववाडी ग्रामपंचायत सदस्य राहुल शिंदे, सुभाष अभंग, सुभाष शिंदे, विकास शिंदे, विकास अहिवळे, कोळकी गावचे विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता नाळे, कामगार नेते बाळासाहेब काशीद, महेश पवार, बापूराव काशीद, अवि साळुंखे, संजय पवार, किशोर पवळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आभार अंबादास दळवी यांनी व्यक्त केले.